Welcome to Agroson

अ‍ॅग्रोसन

अॅग्रोसन ही कृषीक्षेत्रा मधील शेतीविकास व व्यवस्थापन विभागात कार्यरत असणारी ISO 9001:2015 मानांकन मिळवलेली फर्म आहे. अॅेग्रोसन मार्फत कृषी क्षेत्रासाठी जमीन विकास, लागवड व व्यवस्थापन, पायाभूत सुविधा उभारणी, जॉईंट व्हेंचर फार्मिंग, फार्महाउस प्रोजेक्ट्स, कंट्रोल फार्मिंग व कृषीव्यवसाय यासाठी सेवा पुरविल्या जातात.

आज आपल्याकडे भरपूर कृषितंत्र विकसित झालेल असून सुद्धा फार थोड्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचते आणि त्यातील फार थोड्याच शेतकऱ्यांना ते आत्मसात करता येत.आम्हाला अस वाटत शेतकरी कृषितंत्र आणि व्यवस्थापन यामध्ये पारंगत होण्यासाठी नियोजन, निरीक्षण आणि नोंदि यांचे योग्य प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि ह्या सर्व बाबीसाठी अॅग्रोसन शेतकरी बांधवांना एकात्मिक, सुरक्षित व शाश्वत कृषी विकासासाठी अद्यावत तंत्रज्ञान पुरविते.

अॅग्रोसन अंतर्गत शेतीचे सर्वे ऑडिट केले जाते यामधे जमिनीची प्रत, सिंचनव्यवस्था, कृषीनिविष्ठा, पायाभूत सुविधा, पशुधन इ. संदर्भातील माहितीच्या आधारे कृषी आराखडा म्हणजेच फार्मफाईल तयार केली जाते. त्यानुसार पीक पध्द्ती बियाणे, खते व किटकनाशकांच्या शिफारशी केल्या जातात.

अॅग्रोसन डाटा सेंटर च्या माध्यमातून शेती विषयक संपूर्ण माहिती संकलीत करुन www.agrosonaadhar.com या संकेतस्थळावर साठवली जाते. त्याच बरोबर कृषिविषयक घटनेच्या पीकपध्द्ती नुसार वेळोवेळी नोंदी ठेवल्या जातात. या आधारे आगामी पीक नियोजन, कृषीनिविष्ठा इत्यादी संबंधी तयारी करता येते. त्याच बरोबर या नोंदींच्या आधारे उत्पादन खर्च काढुन पिकाचा आर्थिक अहवाल तयार केला जातो. शेतकरी बांधवांची कृषीविषयक वैयक्तिक माहिती या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध असल्याने शेतकरी सहज पाहु शकतो. पशुधनकार्डाच्या माध्यमातून जनावरांचे संगोपन, आरोग्य, आहार इ. च्या नोंदी ठेवल्या जातात.

पायाभूत सुविधा निर्माणच्या माध्यमातून शेतीमधील वाढणारा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बियाणे संवर्धन ,खत व स्लरी निर्मिती, जैविक व वनस्पतीजन्य पिकसंरक्षके, सुक्ष्म सिंचन, पशुखाद्य निर्मिती इ. ची उभारणी संदर्भात मार्गदर्शन व सेवा दिल्या जातात.

अॅग्रोसन मार्कनेट या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणावरुन ऑनलाइन खरेदी, विक्री, व शेतीविषयक सेवा यांची नोंदणी करुन त्यासंबंधित सुविधा पुरविल्या जातात.मार्कनेटच्या माध्यमातून शेतमाल नोंदणी व सादरीकरण, बाजारपेठा, साठवणूक व वाहतूक व्यवस्था, कृषीरसायने व शेतमाल उपलब्धता ईत्यादी संदर्भातील मार्गदर्शन व सेवा दिल्या जातात. या मार्फत शेतकरी आपला ताळेबंद असलेला विषमुक्त शेतमाल ग्राहक व प्रक्रिया उद्योजक यांना विकून शाश्वत फायदा मिळवू शकतो.

अॅग्रोसन कनेक्ट च्या माध्यमातून प्रत्येक पंधरा दिवसांनी शेतकऱ्यांना भेटून अग्रोसन च्या सेवा संबंधित चर्चा करुण असणाऱ्या समस्याचे निवारण केले जाते. त्याचबरोबर शिवारभेट, कार्यशाला व कॉल सेंटर च्या माध्यमातून अॅग्रोसन शेतकऱ्यांशी नेहमी कनेक्ट राहते.

तुमची शेती आमची माणस या माध्यमातून विविध कृषीविषयक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्या लोंकांना सहभागी केले जाते.त्याचबरोबर स्थानिक किंवा त्याच भागातील परंतु नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात, परदेशी स्थायिक असणाऱ्या मान्यवरांना सामाजिक दायित्वाची जाणीव करवुन गावातील कृषी तंत्रज्ञानापासून वंचित असणाऱ्या शेतकरी बांधवाना कृषीतंत्रज्ञान व व्यवस्थापन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोसनकेअर म्हणून सहभागी केले जाते.

अॅग्रोसन प्रकल्प पुर्णतः शेतकरी उपयोगी असून या अंतर्गत संशोधन करुन शिफारस केलेली पिकपध्दती शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवून त्याद्वारे उत्पादन वाढविणे व पायाभूत सुविधांची निर्मिती करुन उत्पादन खर्च कमी करणे या उदिष्ठावर काम केले जाते . त्याचबरोबर पर्यावरण पूरक कृषी निविष्ठांचा आवश्यक, योग्य पध्दतीने वापर व योग्य जलसिंचनाच्या माध्यमातून जमिनीचा सुपिकपणा वाढवला जातो . कार्यशाळेच्या माध्यमातून शेती विषयक आवश्यक तंत्रज्ञान देवून शेती बद्दलचा दृष्टीकोन व आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो.

सदर कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन सेवा शेतकरी उपयोगी असून वंचित, दुर्बल शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अॅग्रोसनला आपले बहुमूल्य सहकार्य मिळावे ही विनंती.

धन्यवाद !अ‍ॅग्रोसन डाटा सेंटरसंपर्क

अ‍ॅग्रोसन कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन,
ग्रीनलँड प्लॉट नंबर - 1
ओमसाई सोसायटी, जरंडेश्वर नाका
सातारा - 415002

सेवा

  • फार्म फाईल
  • पायाभूत सुविधा
  • अॅग्रोसन मार्कनेट
  • अॅग्रोसन डाटा सेंटर
  • अ‍ॅग्रोसन हेल्पलाईन
  • अ‍ॅग्रोसन कनेक्ट

Connect Us with Facebook

2016 © Agroson. ALL Rights Reserved.
Designed and Developed by Visionsoft Solution Satara